हे लगेच घरी तयार करा हा काढा, ऑक्सीजन वाढेल, सर्दी, खोकला, ताप, कफ गायब,how to boost immunity,dr

    137
    0
    हे लगेच घरी तयार करा हा काढा, ऑक्सीजन वाढेल, सर्दी, खोकला, ताप, कफ गायब,how to boost immunity,dr


    हे लगेच घरी तयार करा हा काढा, ऑक्सीजन वाढेल, सर्दी, खोकला, ताप, कफ गायब,how to boost immunity,dr
    अजून एक सुंदर उपाय:
    सध्या बदलती जीवनशैली आणि वाढतं प्रदुषण यांमुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. सगळ्याच वयोगटात एक समस्या कॉमन दिसून येते ती म्हणजे श्वसनांच्या विकारांची. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही समस्या उद्भवते. अनेकांना मद्यपान, धुम्रपान करण्याची सवय असल्यामुळे त्यांची फुफ्फुस खराब व्हायला सुरूवात झालेली असते.
    एका मर्यादेनंतर फुफ्फुस खराब झाल्यास जीवघेणे आजार उद्भवण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला घरगुती उपायांनी फुफ्फुसांची काळजी कशी घेता येईल याबाबत सांगणार आहोत. कारण आजारांपासून लांब राहायचं असेल तर शरीर डिटॉक्स करणं सुद्धा आवश्यक असतं. 
    फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी १ लीटर पाणी, ४०० ग्राम कापलेला कांदा, ५ चमचे मध, २ चमचे हळद आणि १ चमचा कापलेलं आलं या पदार्थांची आवश्यकता असणार आहे.  हा सोपा काढा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर कांदा, आलं आणि हळद घालून मिक्स करा. कमी आचेवर पाणी उकळू द्या.  पाणी उकळून अर्ध्यापेक्षा कमी झाल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर यात मध घाला आणि एखाद्या भांड्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. हा काढा रोज सकाळी आणि संध्याकाळी २-२ चमचे प्या. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर तुम्ही हे सिरप पिऊ शकता. 
    या होममेड टॉनिकमध्ये आलं आणि कांदा आहे. त्या दोन्हींमध्ये  एंटी-बॅक्टीरियल, एंटी-वायरल आणि एंटी-इंफ्लेमेट्री गुण असतात. त्यामुळे शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून संरक्षण करता येतं. या काढयातील पदार्थांमुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.फुफ्फुसांचे आरोग्य चांगलं राहून श्वसनाचे विकार उद्भवत नाहीत. पण या काढ्याचे सेवन करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सिगारेट ओढणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. जर तुम्ही या काढ्याचे सेवन करत असाल तर धुम्रपानाची सवय सोडून द्या.  जर कोणत्याही आजारावर तुमची वैद्यकीय ट्रिटमेंट सुरू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या काढ्याचे सेवन करू नका. 
    #फुफुससाफकरण्यासाठीउपाय #फुफुसाचेआरोग्यसुधारणे
    #फुफुससाफकरणे
    #oxygen
    #fufussafkarane
    #BramhachaitanyaDigital
    #ऑक्सीजन

    source

    Previous articleYavatmal Corona Update | यवतमाळमध्ये कोरोनाचा हाहाकार, 26 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार -tv9
    Next articledesi gym fitness – पतले लोग Body बनाने के लिए करें ये 3 कसरत – Skinny to Muscular – desi gym

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here