#ashakiranclinic #महिलांनाकायआवडते #जीवनसंजीवनी
आरोग्य टिप्स आशाकिरण क्लिनिक डॉक्टर उमेश MBBS | निरोगी आयुष्य जगण्यासाठी Health Tips in Marathi
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये करा ‘हे’ थोडेसे बदल
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हेल्दी आणि फिट राहणं जवळजवळ कठीणच झालं आहे. खरंतर चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारपणं आणि आरोग्य समस्या आपला पाठलाग करू लागतात.आजकालच्या फास्ट जगात पुरेशी झोप आणि सतुंलित आहार तर कुणीही घेताना दिसत नाही. प्रत्येकाला पुढे जाण्याची ऐवढी घाई असते की वर्तमान क्षण जगायचा राहूनच जातो. ज्यातूनच पुढे आरोग्य समस्या निर्माण होऊ लागतात. प्रत्येकाला निरोगी आणि उदंड आयुष्य हवं असतं. पण निरोगी आयुष्य हे सहज मिळत नाही तर ते कमवावं लागतं हे मात्र सर्वच सोयीनुसार विसरुन जातात. मागील काही दिवसांपासून जर तुम्ही सतत आजारी पडत असाल, वारंवार तुम्हाला सर्दी – खोकल्याचा त्रास होत असेल तर याबाबत विनाकारण चिंता करत बसण्यात काहीच अर्थ नाही कारण त्यामुळे काहीच फायदा होणार नाही. धावपळीच्या नादात तुम्ही योग्य आहार घेत नाही, रात्रीच्या जागरणामुळे तुमची पुरेशी झोप होत नाही. या सर्वच गोष्टी तुमच्या आरोग्य समस्यांसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृती हवी असेल तर त्यासाठी स्वतःला थोडासा वेळ द्या. कारण तुम्ही जी सारी धावपळ करत आहात ती स्वतःसाठी आणि कुटूंबासाठीच करत आहात. तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही कुटूंबाला सुखी ठेऊ शकाल. हेल्थ इज वेल्थ हे तर आपण आतापर्यंत कितीवेळा ऐकलं असेल. मग फक्त पैसा कमविण्यासाठी वणवण करण्यापेक्षा थोडं आपल्या शरीराकडे पण लक्ष द्या. कारण सिर सलामत तो पगडी पचाच अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. तुम्ही जे काही कमावलं आहे ते उपभोगण्यासाठी तुमचं शरीर निरोगी असणं फार गरजेचं आहे. दैनंदिन जीवनशैलीमध्ये अगदी थोडेसे बदल करुन तुम्ही या निरोगी जीवनाच्या दिशेने पुन्हा वाटचाल करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची, नियमित व्यायाम करण्याची आणि आहारामध्ये योग्य बदल करण्याची गरज आहे.
स्वस्थ कसे राहावे: स्वस्थ जीवनशैलीसाठी 10 सुलभ टिप्स
जेवणाची सुरूवात सॅलेडने करा
जेवण सुरू करताना भरपूर सॅलेड खा. ज्यामध्ये हिरव्या आणि पोषक पदार्थांचा समावेश करा.
सुपरफूडचा आहारात समावेश करा
संध्याकाळच्या नास्त्यामध्ये फ्लैक्स सीड्स(आळशी), सनफ्लॉवर सीड्स(सुर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सुकामेवा अशा प्रकारच्या सुपरफूडचा समावेश करा. शिवाय दररोज सकाळच्या नास्त्यामध्येही तुम्ही हे सुपरफूड्स घेऊ शकता.
प्रक्रिया केलेले आणि जंक फूड कमी प्रमाणात खा
आहारात प्रक्रिया केलेले पदार्थ, स्ट्रीट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा. शिवाय मद्यपान आणि धूम्रपानही कमी करण्याचा प्रयत्न करा.
आहारात गुड फॅटचा समावेश करा
आहारात गुड फॅडचं असणं फार गरजेचं आहे कारण गुड फॅट आपल्या शरीराच्या पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. यासाठी आहारात राईस ब्रान ऑईल, बदामाचे तेल, सुर्यफुलाचे तेल,ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑईल, फ्लॅक्स सीड्स ऑईल, भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, टरबुजाच्या बिया, फेटा चीज, अंडे, मध आणि मासे या पदार्थांचा समावेश करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट अती प्रमाणात घेणं हे वाईटच. त्यामुळे तुमच्या आहारतज्ञांच्या सल्लानुसार या पदार्थांचे प्रमाण ठरवा.
हवाबंद कोड्रडिंक्स घेणे टाळा
कोल्डड्रिंक्स एखाद्या सौम्य विषाप्रमाणे शरीराचे नुकसान करतात. हळूहळू या पदार्थांचे दुष्परिणाम दिसू लागतात. मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते. डाएट सोड्याचाही तुमच्या शरीरावर दुष्परिणामच होतो. तज्ञांच्या मते यामुळे तुमचे यकृत आणि किडनी खराब होण्याची शक्यता अधिक असते.
फीट राहण्यासाठी तुमच्या वर्क आऊट इंन्स्ट्रक्टरचा सल्ला घ्या. पण जर तुम्ही रोज व्यायाम करत नसाल तर सुरूवात 10 मिनीटे वॉक घेऊन करा आणि हळूहळू हे प्रमाण वाढवत जा. नियमित चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमचे ह्रदय निरोगी राहण्यास मदत होईल. शिवाय लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करा. ज्यामुळे तुम्हाला एखाद्या दिवशी व्यायामासाठी वेळ काढता नाही आला तरी तुमचा सहज व्यायाम होऊ शकेल.
आवडीचा खेळ खेळा
जर तुम्हाला तुमच्या शरीराला सुडौल शेप द्यायचा असेल तर आठवड्यातून कमीतकमी तीन दिवस तुमच्या आवडीचा खेळ खेळा. जर तुम्हाला खेळ खेळण्यात रस नसेल तर कोणतीही एखादी एक्टिव्हिटी जसे की स्केटींग,डान्स, स्विमिंग तुम्ही करू शकता.
आहारात साखर आणि मीठाचा कमी वापर करा
आहारातील साखर आणि मीठ यामुळे तुमचे वजन वाढू लागते. जर साखर आणि मीठ आहारात प्रमाणात घेतलं तर तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.
चेकलिस्ट तयार करा
जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल करायचे असतील तर एक चेकलिस्ट तयार करा आणि दर आठवड्याला ती चेक करा. जर तुम्ही तुमचं ईच्छित ध्येय गाठण्यास कंटाळा करत असाल तर या चेकलिस्टमुळे तुम्हाला चांगलच मोटीवेशन मिळू शकेल.
अशा छोटया छोट्या पण अगदी महत्वाच्या गोष्टींना फॉलो करून तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करू शकता.जीवनशैलीमधील हे बदल तुम्हाला निरोगी आयुष्य आणि तंदरुस्त शरीरप्रकृती देण्यास मदत करतील.
Ashakiran clinic ko subscribe kare aaj he. Ashakiran clinic doctor umesh kahi salo se iss field mai kaam kar rahe hai. Ashakiran clinic mumbai, pune, aurangabad, nashik aur kolhapur mai stit hai.
source
Kolhapur clinic cha no dya